गंगाखेड शहरातील बाजार पेठ कडकडीत बंद

68

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14मार्च):-कारोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दोन दिवसाचे लॉक डाऊन चे आदेश काढले असल्या मुळे पहिल्या दिवशी शनिवार रोजी सर्व व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. तर दिवसभरात शहरातील रस्त्यांवर मात्र अंशताह वाहतुक सुरुच असल्याचे दिसून आले.
प्रशासनाने शनिवार आणि रविवार अशी २ दिवसांची लॉक डाऊन लागू केले आहे. शनिवारी सकाळ पासूनच रस्त्यावर किरकोळ वाहतूक सुरू असल्याचे पहायला मिळाले. तर व्यापार्‍यांनी मात्र आपली दुकाने बंदच ठेवली.

यामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून आले.नगरपालिकांच्या ३ किलोमीटर परिसरात ही लागू केले आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर रस्त्यांवरील तुरळक वाहतुकीसह बसस्थानक काही प्रमाणात प्रवाशांची वर्दळ होती. व बसस्थानकात बाहेरगावाहून आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबत होत्या . गंगाखेड मुख्य बाजारपेठेतही वाहनांची तुरळक गर्दी दिसून आली. डॉ.बाबासाहेबआंबेडकर चौक,ते, शिवाजी चौक, भाजी मार्केट, बसस्थानक रोड, स्टेशनरोड हा बाजारपेठेचा भाग पूर्णत: कडकडीत बंद होता.