वीर बाबुराव शेडमाके यांचा आदर्श बाळगावे आवश्यक- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी

29

✒️सडक अर्जुनी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सडक अर्जुनी(दि.14मार्च):- गोंडवाना गोंड समाज संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, विद्यार्थी संघ तालुका शाखा सडक अर्जुनी अंतर्गत ग्रामशाखा रेंगेपार/ कन्हारटोला च्या वतीने स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके जयंती समारोह निमित्त पारी कुपार लिंगो पुतळ्याचा अनावरण व समाज प्रबोधन सोहळा आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून डॉ नामदेवराव उसेंडी (माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली), विशेष अतिथी म्हणून डॉ नामदेवराव किरसान (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया),भरत मडावी अध्यक्ष गोंडवाना गो स गोंदिया, सरिताताई कापगते माजी सदस्य जिल्हा परीषद गोंदिया, दिलीप मडावी, छायाताई टेकाम सरपंचा ग्रा प रेंगेपार, दिपक मडावी व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी रेंगेपार येथे खुप मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे भारतीय समूहाचे स्वातंत्र्ययोद्धा होते. यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठीं म्हणून चांदा येथील इंग्रजांविरुद्ध अतिशय कठीण परिस्थिती मध्ये युद्ध उभारले. म्हणून इंग्रजांनी वीर बाबुराव शेडमाके याना चांदा येथील कारागृहात फाशी दिले. वीर बाबुराव शेडमाके यांनी देशाच्या सातंत्र्यसाठी लढा दिला. याचा समाजाने आदर्श बाळगावे. असे यावेळी उपस्थित जनतेला संबोधित केले.