पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा- डी.टी.आंबेगावे

28

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी.एस.आय. शिवराज खराडे यांचा सत्कार

✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

रायगड(दि.14मार्च):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील तळा येथे नवीनच रूजू झालेले पी.एस.आय. शिवराज खराडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख, तळा पोलीस ठाणेचे पी.आय. सुरज गेगंजे, संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, सांताक्रुझ तालुकाध्यक्ष संतोष येरम, तळा तालुका संघटक नजीर पठाण, पत्रकार पराग मोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावेत त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देता येईल व लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले तसेच तळा तालुक्यातील पोलीसांनी कोविड १९ व लाॅकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केल्याचे सांगितले.

राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी पोलीस जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करतात तर पत्रकार जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात असे भाष्य केले. राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख यांनी पोलीस व पत्रकार हे दोन्ही घटक जनता व समाजाच्या हितासाठी कार्यतत्पर असतात त्यामुळे पोलीस व पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पदाधिका-यांनी तळा पोलीस ठाणेत नवीनच रूजू झालेले पी.एस.आय. शिवराज खराडे यांच्याकडून तळा तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.