तलवाडा ग्रामपंचायत हाद्दितील आनंदवाडी शिवारात वनविभागाच्या कार्यशेत्रात हाजारो झाडांची कतल करुन मुरुमाचे उत्खनन

37

🔹वनविभागाच्या कार्यशेत्रातील झाडे तोडना-यांवर कार्यवाही करण्यात येईल का – कचरे

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)मो:-9767177932

तलवाडा(दि.16मार्च):-गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत आसलेल्या आनंदवाडी शिवारात पोईतांड्या लगट वनविभागाच्या आख्त्यारित आसलेल्या गायरान जमिनीमध्ये वनविभागाच्या माध्यमातुन गेल्या आणेक वर्षा पुर्वी निलगिरीच्या झाडासह विविध प्रकारची झाडे लाऊन ती योग्यरित्या जतनही करण्यात आली होती. वनविभागाचे हे गायरान नंदनवना सारखे पाहना-याचे डोळे दिपऊन घेत होते.

परंतु गेल्या वर्षा दोन वर्षाच्या कालावधी पासुन ते या चालु वर्षा पर्यंत शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या उद्देश्याची पायमल्ली करत या गायरानातील हाजारो झाडांची कतल करुन मुरुमाचे उत्खनन करण्यात आसल्याचे प्रतेक दर्शनी दिसुन येत असुन काल दिनांक १६ /३/२०२१ रोजी या ठिकाणी तलवाडा ग्रामपंचायतचे विध्यमान सदस्य कचरे. पोईतांड्याचे काही नागरिक व पत्रकार बांधवांसमक्ष या ठिकाणी अवेधरित्या मुरुमाचे उत्खनन करतांना एक जी. सी. बी. मशीन व एक हॅयवा या ठिकाणी आढळुन आल्याने कचरे यांनी चौकशी केली आसता संबधित जी. सी. बी. व हॅयवा चालकाने सांगीतले की आम्ही गेवराई तहसील कडे आॅन लाईन चलन भरले आहे. कचरे व उपस्थित नागरिकांनी चलन भरल्याचा पुरावा मागताच हॅयवा व जी. सी. बी. चालक तेथुन वाहना सह निघुन गले.
तालुक्यात सुरु आसलेल्या विविध रस्त्याच्या कामाला मुरुमाची मोठ्या प्रमाणात गरज असलीतरी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करण्या-यास शासन प्रशासनातील पदाधिकारी प्रोहत्सान देतात की काय? आसा प्रश्न या ठिकाणी उपस्थिति होत असुन गेल्या काही वर्षा पासुन या ठिकाणी मुरुमाचे उत्खनन सुरु आहे ते आज तागायत सुरु असुन स्थानीय ग्रामपंचायतचे ना हारकत व गेवराई तहसीलच्या पूर्व परवानगी शिवाय हे शक्य होतय काय? आसा प्रश्न तलवाडा ग्रामपंचायतचे विध्यमान सदस्य कचरे यांनी उपस्थिति केला.
असुन कुठल्याही शासकीय गायरान जमिनीमध्ये उत्खनन करन्याचे व पूर्व परवानगी देन्याचे अधिकार तहसिल महसुल प्रशासनाच्या आख्त्यारित आसले तरी तलवाडा ग्रामपंचायत हाद्दितील आनंदवाडी शिवारात वनविभागाच्या कार्यशेत्रात हाजारो झाडांची कतल करुन मुरुमाचे उत्खनन शक्य आहे का आसा प्रश्न या भागातील निसर्ग प्रेमी सह तलवाडा ग्रामपंचायतच्या विध्यमान सदस्या सौं गंगा गणेश कचरे यांनी उपस्थिति केला असुन काही वर्षा पुर्वी निलगिरीच्या झाडासह विविध झाडांनी बहरलेले वनविभागाच्या आख्त्यारित आसलेल्या गायरान जमिनीला सद्या तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र पाहन्यास मिळत असुन झाडांची कतल हा महत्वाचा मुद्दा असुन निसर्गरम्य या परिसरातील झाडे तोडना-या सम्मेलित महाभाची चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल का आसा प्रश्न कचरे यांनी उपस्थिति केला आहे.