घाटनांदूरमध्ये सापडला अनोळखी व्यक्तीचे मृतदेह

28

✒️राहुल कासारे((घाटनांदूर सर्कल प्रतिनिधी अंबाजोगाई)मो-9763463407

घाटनांदूर(दि.17मार्च)) :- दि 15 रोजी घाटनांदूर येथील रेल्वे स्थानक परिसरातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटली नाही.

येथील रेल्वेस्थानकाच्या समोरील गट न. २६९ शेतात सायंकाळी सातच्या दरम्यान अंदाजे ६५वर्ष वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर पांढरे नेहरू शर्ट, पांढरा चोळणा, डोक्यावर पांढरी टोपी अशा गणवेश आहे.पोलीसांनी मयत व्यक्तीचा पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेवुन ते स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्नालयात आंबाजोगाई या ठीकाणी शवगृहात पाठवीले आहे. तरी पुढील तपास बीट अंमलदार पो काॅ बिक्कड व पो.काॅ सावंत हे करत आहे.