कोरेगाव भिमा प्रकरणात खोटा बनाव करून महाराष्ट्रातील मागासवर्गीय आदिवासी तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करावेत- वंचित बहुजन आघाडीची मागणी

  48

  ?भीमा कोरेगाव प्रकरणातील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा तिव्र आंदोलन करू- संजय तेलंग

  ✒️राहुल कासारे(घाटनांदूर सर्कल प्रतिनिधीअंबाजोगाई)मो-9763463407

  अंबाजोगाई(दि.17मार्च):- १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमसागर जमला होता, त्याच दिवशी अभिवादन करणाऱ्या वर हल्ला करण्यात आला होता, हे प्रकरण झाल्या नंतर महाराष्ट्र भर आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले होते ते रद्द करावी या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आले, व राज्य सरकारने हे गुन्हे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. एक डोळस, सजग व न्यायाशिल चारित्र्यशील व्यक्तीमत्व तसेव सन्मानीय प्रबोधनकारांच्या विचारांचे वारस म्हणुन आपेक्षा करतोत की, कोरेगाव भिमा प्रकरण 01 जानेवारी 2018 या साली आबेडकरी अनुयायांवर विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले असतानां पुर्वनियोजित देशाच्या, राज्याच्या एकात्मतेला बाधा आणु पाहणाऱ्या काही विकृत मानसिकेतच्या समाजकंटकांनी एकतर्फी हल्ला करुन आपल्या आया बहीणीस, प्रौढ, तरुण, बालक यांना मारहाण केली.

  तसेच विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायाच्या गाडया जाळुन राख केल्या. त्याप्रकरणातील मुख्यसनाधार मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांना गृहविभागाने क्लीन चिट दिलेली आहे.
  वास्तविक पाहता खोटया प्रकरणात महाराष्ट्रभर मागासवर्गीय आदिवासींच्या सुशिक्षित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामुळे त्यांचे भवितव्य अधारमय झालेले असून दैनंदिन जिवन विस्कळीत झालेले आहे.तरी महाराष्ट्रातील खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेल्या तरुणावरील खोटे गुन्हे तात्काळ रद्द करूण गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संजय तेलंग यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

  असता निवेदनावर वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई चे तालुका प्रवक्ते गोविंद मस्के, गायरान हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर जोगदंड, नामदेव वाघमारे, तात्याराव जोगदंड, तानाजी जोगदंड, वंचितचे तालुका विधी सल्लागार ॲड.संतोष वाघमारे यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.