सेवादासनगर तांड्यात कडब्याच्या गंजीला भीषण आग

29

🔺किमान तीस ते चाळीस हजाराचे मोठे नुकसान

✒️हणेगाव प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.17मार्च):-ग्रामपंचायत अंतर्गत दोन किमी अंतरावर असलेल्या सेवादासनगर तांड्यातील भिकू गोमा राठोड या शेतकऱ्यांच्या शेतातील तीन ते चार हजार कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याने शेतकरी एकदम हतबल झाला आहे.आज घडीला या कडब्याची किंमत किमान तीस ते चाळीस हजार एवढी आहे व या शेतकऱ्याच्या घरी किमान आठ ते दहा जनावरे असल्यामुळे त्याच्यापुढे मोठे संकट उभे झाले आहे.

अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडले नसताना आणखी एक संकट उभा झाल्यामुळे भिकु गोमा हा शेतकरी हैराण झाला आहे व या शेतकऱ्याचे संसार उघड्यावर आले आहे.तरी संबंधित विभागाने या शेतकऱ्याच्या शेतातील जळालेल्या कडब्याच्या गंजीची चौकशी करून तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची होत आहे.