नायगाव तालुक्यातील गावांना ग्रामविकास विभागाच्या योजनेतून विकासाकरिता निधी द्यावा- वसंत सुगावे पाटील

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18मार्च):-नायगाव तालुक्यातील घुंगराळा, वंजारवाडी, रुई, सावरखेड, कहाळा(खु),पाटोदा, कहाळा(बु) या गावातील सी .सी.रस्ते,नालीबांधकाम या कामांकरिता ग्रामविकास विभागाच्या 25/15 ,गट ब या योजनेतून निधी द्यावा. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटनिस वसंत सुगावे पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे मा.ना. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन अशी मागणी केली आहे. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव कदम कुंटूरकर हेही उपस्थित होते.

काही गावामध्ये ही कामे अपूर्ण असून तर काही गावांत आद्यप ही कामे झालेली नाहीत त्यामुळे या गावात कामे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या गावांना लवकरात लवकर निधी देऊन ही कामे मार्गी लावावीत अशी मागणी वसंत सुगावे पाटील यांनी ग्रामविकासमंत्री मा.ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे..निवेदन पत्रात नमूद केलेल्या गावांसहित इतर अजुन काही गावांमध्ये निधी ची आवश्यकता आहे त्या मुळे त्या गावांना सुद्धा निधी देण्यात यावा, अशी मागणी सुद्धा सुगावे यांनी या वेळी केली..