नायगाव शहरामध्ये तीन ते सहा वर्षांच्या विद्यार्थि / बाळाचे वही पेन व सत्कार करून अंगणवाडी मध्ये प्रवेश

24

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नायगाव(दि.21मार्च):- शहर येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नायगाव तेथे अंगणवाडी कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्यावतीने वयोमर्यादा तीन ते सहा वयोगटाच्या विद्यार्थी / बाळांचे वही व पेन देवून सत्कार व सन्मान करून अंगणवाडी शाळेत प्रवेश करण्यात आला .विद्यार्थी रमेश पंढरी गायकवाड, प्रणव आनंद गायकवाड, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा सह यांचा अति महत्वाचा व खूप आनंदाचा दिवस आहे.तसेच नायगाव शहर येथील एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या अडीअडचणी जाणून घेत असताना यामध्ये चार अंगणवाडी साठी नायगाव शहरांमध्ये जागा उपलब्ध असल्याकारणाने एकाच खोलीमध्ये क्रमांक 10 ,15, व 19 हे प्रकार चालू आहे.

ज्या काही अंगणवाड्या असणाऱ्या या अंगणवाड्यांची दुरुस्ती त्यामध्ये खिडकी, दार, फरशी, कपाट, टीनशेडला चिद्र आहेत व बिल्डींग खराब अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे संबंधित तालुका एकात्मिक बाल विकास विभाग नायगाव यांच्या सोबत त्या विषयाबाबत चर्चा करण्यात आली  या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ता तथा मा.नगरसेवक प्रतिनिधी गजानन पाटील चव्हाण हर्षद बोयाळ, धनंजय पाटील चव्हाण
छायाताई भालकी,  सविताताई मारशेट्टीवार, वंदनाताई एडके, सुरेखाताई व्यवहारे, मीरा गायकवाड, वंदनाताई भाकरे, बायनाताई टोकलवाड, माधाबाई गाडगे, रंजनीताई देशपांडे, उषाताई मेलतपेदेवार, व अंगणवाडी सेविका मदतनीस सह या ठिकाणी चिमुकल्या बाळाची आई व वडील उपस्थित अंजनबाई पानंडागळे, अनुसयाबाई कावडे, अश्विनीताई डोईवाड, गंगाबाई गायकवाड सह बाळांचे आई-वडील सह अनेक उपस्थित सर्व बांधवांना होते.