तीन वर्षापासून बंद पडलेला बोर चालू करून दिले गावक-यांना दिलासा

30

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हनेगाव(दि.24मार्च):- हणेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र.२ मधील पाण्याची बोर गेल्या दोन-तीन वर्षापासून बंद असल्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती ,पण नुकतेच निवडून आलेल्या सरपंच सौ वैशाली विवेक पडकंठवार,उपसरपंच मुजिबोदीन चमकुडे यांच्या पुढाकाराने हे बंद असलेल्या बोरला तात्काळ नवीन मोटार बसवून चालू करून देऊन जनतेची होणारी पाण्यासाठीची भटकंती थांबवल्यामुळे व तात्काळ तेथील लोकांची सोय करून दिल्यामुळे या वार्डातील जनतेने या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच सदस्य यांचे आभार व्यक्त केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार ,हजूसेठ चमकुडे ,शंकर राठोड ,वसंत आडेकर ,नागेंद्र गिरेवाड, उमाकांत पंचगले,ग्रामपंचायत कर्मचारी अहेमद अतार,तेथील नागरिक खमरोदीन मचकुरी यांनी कामाविषयी समाधान व्यक्त केले असून पुढील वर्षात या वार्डातील या रोडचे दुरावस्थेत असलेले काम व विद्युतच्या खांबाचे काम पूर्ण करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.