कोरोना महामारीने व्यापारी झाले त्रस्त

80

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.२४मार्च):- सध्या घडीला जगभरात एकच चर्चा चालू आहे,ते म्हणजे कोरोना.दि.२३/३/२०२० पासून ते आज दि.२४/३/२०२१ म्हणजे एक वर्ष उलटला पण ह्या कोरोना महामारी बिमारीचा अर्थ आणखीन जनसामान्य मानसाला कळालाच नाही.पण या कोरोनामुळे जनसामान्यच नाही तर सगळ्यात जास्त त्रास सहण करावा लागतो म्हणजे व्यापाऱ्याला.आज घडीला एक वर्ष उलटला आता कुठेतरी बाजारपेठा व्यवस्थित चालू होत असतानाच आणखी कोरोनाने डोके वर काढून व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरवले आहे.काही व्यापाऱ्याचे असे म्हणणे आहे,की कोरोनाचे उगमस्थान म्हणजे व्यापारी आहेत.त्यामुळे रोज नवीन नियम लादण्यात येत आहेत.

सकाळी सात ते सध्याकाळी पाच पर्यंतच दुकाने चालू त्याच्यानंतर दुकाने बंद.हा कोणता नियम झाला,आमचे दुकाने बंद झाले म्हणजे कोरोना गायब झाला का,आमचे दुकाने बंद व दुसऱ्याचे दुकाने चालू हा कोणता नियम आहे असा प्रश्न व्यापारी वर्गातून निघत आहेत.काही व्यापारी या कोरोनामुळे कर्जबाजारी होऊन व्यापार करणे बंद केले आहेत तर काही व्यापारी असेच विचारात पडले आहेत.आज आणखीन लॉकडाऊनच्या भितीने व्यापारी वर्ग चिंतेत सापडला आहे.

अगोदरच नौकरदाराची पगार,दुकानभाडे,लाईटबिल,सेलटक्स,स्वताचा खर्च या सगळ्यांचा विचार करता आज घडीला व्यापारी उठून गेल्यात जमा आहे.आज घडीला व्यापारी विचार करत आहे की,कोरोना हे कपड्याच्या दुकानातुन होतो का,जनरल स्टोअर्स मधून होतो का,मोबाईल दुकानातुन होतो का या विचारात व्यापारी परेशान आहे.या दुकानातून कोरोना बिमारी वाढते तर किराणा दुकान,भाजीपाला,दुधाचे दुकान या दुकानातून कोरोना होत नाही का का असा प्रश्न व्यापारी वर्गातुन होत आहे.यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.