रि.पा.ई (आठवले)पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे यांना पोलीस संरक्षण द्या-रिपाई उत्तर महाराष्ट्र शाखेची मागणी

28

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.25मार्च):-नाशिक.रोड येथे दिनांक २४/३|२०२१बुधवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे नाशिक रोड येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागा मार्फत नायब तहसीलदार मा.कैलाजी निकम साहेब रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी रमेश जी मकासरे साहेब तसेच त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळणे कामी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की रमेश जी मकासरे २२|३|२०२१रोजी भुसावळ येथील समता नगर येथे १० ते १५ गुंडांकडून हल्ला करून घराची तोडफोड केली घरी त्यांची पत्नी व भुसावळ शहराच्या माजी उपनगराध्यक्ष सौ.लक्ष्मीताई रमेश मकासरे व मुलगा राहुल मकासरे हे दोघे एकटेच असल्याने आरडाओरडा झाल्याने त्यांनी एका खोलीत स्वतःला कोंडून घेतल्याने आपला जिव वाचवला रमेशजी मकासरे त्यांची पत्नी मुलगी हे भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक असून ते नेहमी गाव गुडांन विरुद्ध आवाज उठवित असल्याने त्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण मिळावे.

निवेदनावर रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र सचिव रविभाऊ गांगुर्डे, रिपाईचे जेष्ठ नेते गणेशजी (महाराज) साळवे,उत्तर महाराष्ट्र नेते भास्करजी साळवे,नोमन शहा,उत्तर महाराष्ट्र नेते रवी भास्कर गांगुर्डे,किरण नाना दोंदे,विक्रांत गांगुर्डे,प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..