लाँकडाऊनच्या काळात गोरगरीबांचा पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडवणार ?

31

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

नांदेड(दि.25मार्च):-जिल्ह्यात दिनांक २४ मार्च च्या मध्यरात्रीपासून लाँकडाऊन लागू झाला.गोरगरीब नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडवणार? रोजंदारीवर काम करणारे भाजीपाला विक्रेते, छोटे हॉटेल मालक, छोटे व्यापारी,केश कर्तनालय,जनरल स्टोअर्स,छोटे भुसारवाले,ईलेक्ट्रीकल,मोबाईल शॉप,टेलर्स, अशा घटकावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांची योग्य ती सोय करून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे नागरिक करीत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात राज्यात देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिनांक 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत संपूर्ण जिल्हाभर लॉकडावून जाहीर केल्याचे पत्रक काढले आहे. हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर लागल्याचे सोशल मीडियातून दिसून येत आहे.

त्यामध्ये दररोज रोजंदारीवर काम करणारे भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, हात गाडी चालक, रोजंदारीवर काम करणारे तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक व्यक्तींवर लॉकडाऊंचा परिणाम होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या लॉकडाऊनला प्रखर विरोध दर्शविला असला तरी मागच्या एका वर्षांपासून शासनाने कोरोणाची भीती दाखवत अनेकांच्या नोकऱ्या घालून त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण करून त्यांचे उत्पन्न बंद केले.

परंतु त्यांचे होणारे उपासमारी दूर करण्यासाठी काही उपाय केले नाहीत. त्यात भर म्हणुन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आता जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात कोरोना विषाणू वर मात करणाऱ्या लसीची निर्मिती करण्यात आली असली तरी कोरोना योद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही लस देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास सहित रोजंदारीचा प्रश्न मिटवुन जिल्हाप्रशानाने लॉकडाऊन करावा अशी मागणी शहरातील नागरीक करीत आहेत.