संचारबंदी काळात शेतीमाल,भाजीपाला,फळे खरेदी-विक्रीसाठी आडत,मोंढा सुरू ठेवा – कुलदीप करपे

46

🔹शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी, दुचाकीला संचारबंदी मधून सूट द्यावी

🔸स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची मागणी

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.26मार्च):-जिल्हा प्रशासनाने दि.26 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ,गोरगरिबांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे कारण संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषि उत्पन्न बाजार समित्या व त्याअंतर्गत आडत, मोंढा बंद राहणार आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे शेतीमाल उदा. गहू,ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळे आदींचे खरेदी-विक्री बंद झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. सद्या रब्बी पिकांचे काढणी, मळणी चालू आहे नंतर शेतकऱ्यांना पुढील हांगामासाठी मशागत करायला ट्रॅक्टर,जेसीबी, दुचाकी आदी वाहने आवश्यक आहेत मात्र प्रशासनाणे सदर वाहनांवर बंदी घातली आहे.

या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांची आज दि.25 रोजी भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात त्यांनी संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्यांअंतर्गत मोंढा ,आडत दुकाने चालू ठेवून सर्व प्रकारच्या शेतीमालाचे ,भाजीपाला, फळे यांचे खरेदी-विक्री चालू ठेवावेत तसेच शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर,जेसीबी, दुचाकी आदी वाहनांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा देऊन संचारबंदी काळात सवलत द्यावी व शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.