✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि. 26 मार्च ):-जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 212 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 701 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 542 झाली आहे. सध्या 1742 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 65 हजार 962 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 34 हजार 501 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये पंचशील वार्ड, गोंडपिपरी येथील 56 वर्षीय पुरूष व म्हाडा कॉलनी चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 417 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 378, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 212 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 70, चंद्रपूर तालुका 14, बल्लारपूर 13, भद्रावती 18, ब्रम्हपुरी चार, नागभिड 12, सिंदेवाही सहा, मूल नऊ, सावली तीन, गोंडपिपरी एक, राजूरा 16, चिमूर 17, वरोरा 23, कोरपना चार व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज(26मार्च) 69 नवीन कोरोना बाधित तर 34 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.26मार्च):-आज जिल्हयात 69 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10397 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9862 वर पोहचली. तसेच सद्या 426 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.10 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 69 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 43, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी 3, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली 1, कुरखेडा 3, सिरोंचा 1, तर वडसा तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 34 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, अहेरी 1, आरमोरी 6, चामोर्शी 1, धानोरा 1,कोरची 3, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1, रामपूरी वार्ड 5, गुरुकानगर गोंडवाना विद्यापीठ जवळ 1, बुध्दविहार नवेगांव कॉम्पलेक्स 4, कन्नमवार वार्ड 5, लिटील फ्लॉवर शाळा वसा 2, नवेगांव 4, जेप्रा 1, इंदाळा 1, गोकुलनगर 1, गांधीवार्ड 2, आशिर्वाद नगर 4, स्थानिक 1, एसआरपीएफ कॅम्प 2, डी-54 जिल्हा परिषद कॉलनी 1, सर्वोदय वार्ड 1, रामनगर 1, गणेशनगर 1, रामनगर 1, कोटगल 1, कॅम्पएरिया 1, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली 2, वडेगांव 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये राजेंद्र वार्ड 1, वीरर्सी वार्ड 1, स्थानिक 1, कस्तुरबा वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 2 , आलापल्ली 4, स्थानिक 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये बेजू 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, वैरागड 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 2,चौधमपल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये मोयाबिनपेठा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, गडचिरोली, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED