✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.26मार्च):-येथील न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांची बीड जिल्हा नियोजन मंडळावर सदस्यपदी तर सुर्यभान मुंडे यांची बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सदस्यपदी निवडीबद्दल पंचायत समिती येथे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटाबांधून पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. 

पंचायत समिती येथील सभागृहात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांची बीड जिल्हा नियोजन मंडळवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच पुर्नलोकन समिती तालुकाध्यक्ष सूर्यभान मुंडे यांची बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, वसंत तिडके सटवाजी फड यांच्यासह सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भगवानराव कांदे, मरळवाडीचे सरपंच प्रभू आंधळे, जिरेवाडीचे सरपंच गोवर्धन कांदे, उपसरपंच शिवाजी मुंडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश मुंडे, अंगद कांदे, लाडझरीचे शिरीष नाकाडे, टोकवाडी ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंडे, धोंडीराम मुंडे व इतर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED