🔹नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे =सपोनि प्रताप नवघरे

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

बीड(दि.27मार्च):- जिल्ह्यामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवले आहे. अत्यावश्यक कामासाठी निघालेला नागरिकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना जाण्यात परवानगी देत आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांनी आपलं काम करून आपल्या घरी लवकर जावे.

याची अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे पेट्रोलिंग करत असताना दिसत आहेत.

तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर झाल्याने प्रशासनाने प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे सुरक्षित रहा घरी थांबा असे आवाहनही केले आहे. जास्त लोक थांबू नये कुठे गर्दी करू नये असे देखील सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED