चिमुकल्याची हत्या करणाऱ्या सावत्र बापास जन्मठेपेची शिक्षा

53

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.27मार्च):- तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करून सहा वर्षीय चिमुकल्यांची हत्या केल्याप्रकरणी सावत्र बापास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए,एस, वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली साहिल उर्फ निरंजन साहिल उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जग प्रसाद चतुर्वेदी (राहणार खंडोबा चाळ पंचशील नगर एन डी पटेल रोड )असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेत नकुल सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता तर नंदिनी (10 )ही मुलगी जखमी झाली होती.

याप्रकरणी डी एस तर ए स्तर एस्तेर सतीश दलाल (राहणार मिशन मळा शरणपूर) यांनी तक्रार दाखल केली होती पहिल्या पतीपासून झाल्या दोन मुलांसह संत आदिया चर्च परिसरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेशी आरोपीचे प्रेमसंबंध होते लव अंड रिलेशनशिप नुसार राहणाऱ्या दाम्पत्याने 25 फेब्रुवारी 20 18 रोजी रात्री किरकोळ कारणातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोघा मुलांना कपडे धुण्याच्या धोबाटनी साह्याने बेदम मारहाण केली ‘ त्यामुळे नंदिनी व नकुल हे दोघे बहिण भाऊ रात्रभर विव्हळत पडले होते पडले होते ही बाब सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात येता दोघांना तात्काळ जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच नकुल यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तत्कालीन वरिष्ठ अधिकारी अशोक भगत यांनी आरोपी चतुर्वेदी यांच्यासह त्यांच्या प्रेयसीचा बेड्या ठोकल्या होत्या या घटनेत सर्व पुरावे गोळा करून पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते सरकारतर्फे एडवोकेट वाय डी कापसे यांनी काम पाहिले हवालदार युएस गोसावी यांनी गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला असता न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष तपासी अंमलदार यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे अनुसरून अनुसरून चतुर्वेदी यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली