वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन मलकापूर येथे उत्साहात साजरा

29

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.27मार्च):- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष उदयास आणला आणि सर्व वंचित बहूजनांना एकत्र करित या तीन वर्षात साहेबांनी हा पक्ष फार मोठा केला तसेच सर्व कार्यकर्त्यांनी खुपच मेहनत घेतली म्हणून आज पुर्ण भारतभर वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.त्याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने वाढत आहे व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे

या माध्यमातून मलकापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केक कापून तिसरा वर्धापन दिन साजरा केला*
*याप्रसगी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी वर्धापण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात पुढे होणाऱ्या पं. स., जि. प. निवडणुकीत वंचीतची सत्ता स्थापन करण्याचा दृष्टीने कार्यकर्त्यानी कार्य करावे असे प्रतिपादन केले.यावेळी जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, युवानेते संजय दाभाडे, विजय झनके,गजानन झनके, राजू शेंगोकार, विलास तायडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते*