नेरीत घरोघरी कृत्रिम पाणवठे – पर्यावरण संवर्धन समिती चा उपक्रम

36

🔹मास्क व सोसियल डिस्टन्स चे पालन

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.28मार्च):-पक्षी पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे. पक्ष्याशिवाय पर्यावरणाचा विचारच करु शकत नाही. तोच घटक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवाचा स्वार्थ पक्ष्यांच्या जिवावर उठला आहे. वृक्ष तोड, वनवा , जंगलतोड, रासायनिक खताचा बेसुमार वापर, मोबाइल चा अतिवापर, प्रदुषण, शिकार यामुळे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

स़ध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. पाण्यासाठी पक्षी वणवन भटकत आहे. पाण्याअभावी पक्ष्यांच्या मृत्यू होत आहे. कुठे पाणी मिळेल का ❓ यासाठी पक्ष्यांच्या चिवचिवाट कानी एेकु येत आहे. पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. ही भटकंती थांबवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती नेरी कडून नेरी येथे घरोघरी झाडावर पक्षी घागर लावण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, तुशांत पिसे, सुदर्शन बावने, आधार गोडघाटे, मयुर कुंदोजवार, रुपेश घोनमोडे, राहुल गहुकर हे उपस्थित होते.