नागपुरातील ‘दीक्षाभूमी’ साठी १७ कोटी मंजूर, ना.आठवले यांचे आभार

28
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपुर(दि.28मार्च):-दिक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली आहे.यापैकी ४ कोटी रूपयांचा धनादेश नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित १३ कोटी रूपये टप्प्या-टप्प्याने पाठविले जातील, अशी माहिती आठवले यांनी या वेळी दिली.दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन वर्धापनदिनानिमित्त एकत्र येतात.

त्यासाठी शासन स्तरावर विविध सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे आठवले म्हणाले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतमभाऊ सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य सचिव, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष सुमितजी वजाळे व रिपाइं (आठवले) पक्षाचे मुंबई चिटणीस, आणि रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे आणि आयटी सेल मुंबई अध्यक्ष उमाजी प्र. सपकाळे यांच्या वतीने आठवले साहेब यांचे खूप खूप आभार वेक्त करण्यात आले आहे.