🔸प्रमाणपत्र काढायचे असतील तर प्रत्येक महिना 500 रुपये द्या

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.28मार्च):- तालुक्यातील तहसील कार्यालयात विक्रम दुर्गे हा रोजीने जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलर व अधिवास प्रमाणपत्र चे केसेस बघण्याचे काम करतो. आजच्या काळात प्रत्येकाला हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याकरिता लोक गावामध्ये असलेल्या ग्राम पंचायत ऑपरेटर कडून ऑनलाईन करतात, मात्र या ऑपरेटर कडून असे विक्रम दुर्गे सारखे लोक पैश्याची मागणी करतील तर ऑपरेटर काय करणार.

या महत्त्वाच्या प्रमाणपत्रासाठी सरकारी अधिकारी न ठेवता अश्या लोकांची काय गरज.विक्रम दुर्गे हा या अगोदर सुद्धा तहसीलदार मा. गजभिये मॅडम असतांना सुद्धा लाच घेतांना व आलेल्या मुलींचे मो. नं. घेऊन त्यांना छेडछाड करण्याच्या कारणावरून त्याला कामावरून खाली केले.

त्यांची बदली होताच या व्यक्तीने नवीन तहसीलदारांना विनवणी करून पुन्हा येऊ लागला. तहसीलदार साहेबांनी त्याची कीव जाणत इमानदारीने काम करायचे असेल तर ये म्हणून त्याला रोजिणे कामावर ऑफिसमध्ये यायला सांगितले. याचाच फायदा घेत पुन्हा आपले कारस्थान सुरू केला आहे. तो पुन्हा लोकांकडून पैसे घेणे चालू केले आहे. एवढच नाही तर आता सरळ ऑपरेटर लोकांना मागायला सुरुवात केले आहे. तुम्हाला लवकर केसेस पाहिजे असेल तर मला 500 रुपये द्या जो कुणी देणार नाही त्याची केसेस लवकर निघणार नाही असे स्पष्ट धमकी दिल्यासारखे मागणी करत आहे.

तहसील कार्यालयात रोजंदारीचे मुल ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. कुणालाही न घाबरता तो ऑपरेटर ला फोन करून पैश्याची मागणी करतो. मग अश्या वेळेस ऑपरेटर लोकांनी काय करायचे. लोक तर त्यांच्यावर ओरडतात, आणि ऑफिस मध्ये असा प्रकार चालतो. विक्रम दुर्गे ला तुरंत काढून टाकावे व या जागी चांगल्या सरकारी अधिकारी ची नेमणूक करावी अशी काही ऑपरेटर लोकांची मागणी तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. के. डी. मेश्राम साहेब यांना केले आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED