उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना भावपूर्ण निरोप

28

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.28मार्च):-वनविभाग कार्यालय, गडचिरोली येथे कर्मचारी वृदांतर्फे मा. उमेश वर्मा भा.व.से. उप वनसंरक्षक यांची बदली संशोधन नागपूर येथे झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कुमारस्वामी एस.आर. (भावसे) उपवनसंरक्षक गडचिरोली हे होते तर प्रमुख प्रमुख पाहूणे म्हणून मा.प्रभाकर सोनडवले जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना , सिद्धार्थ गोर्वधन महासचिव व . निखडे वनपरिक्षेत्र अधिकारी हे होते. कार्यक्रम आयोजन विभागातील कर्मचारी वृंद यांचे तर्फे वर्मा यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात वर्मा यांनी कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे शासनाची सेवा करावी व तेवढाच वेळ कुटुंबासाठी द्यावा. कुटुंब सुखी असेल तर सेवा उत्तम रित्या करता येते .बदली झाली तरी मी सदैव आपल्या सोबत आहे.असे सांगितले. कुमारस्वामी साहेबांनी वर्मा साहेब मला नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांचे कडून बरेच शिकता आले. त्यांनी गडचिरोली चा वर्किंग प्लॅन तयार करून उत्कृष्ट कर्तव्य केले. असे मोलाचे मार्गदर्शन केले. सोंडवले व गोवर्धन . यांनीही वर्मा यांच्या जीवनावर आणि कर्तव्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन अमित दंडेवार वनपाल यांनी तर प्रास्ताविक व आभार जवाहर गेडाम वनपाल यांनी मानले. यशसवीतेसाठी आकाश सोनडवले वनपाल यांनी तर रामटेके सर्व्हअर, भारत वाहनचालक , लांजेवार, दहिकर, कोल्हे , कु.बोरकुटे यांनी परिश्रम घेतले.