होळी व धुलीवंदन रंगपंचमी सर्व जातीचे लोक विशेष तरुण तरुणी अतिशय उत्स्फूर्तपणे होळी साजरी करतांना दिसतात.९० टक्के तरुणांना हे सांगता येत नाही की होळी का जाळतात. गौड राजा हिरण्यकश्यपू यांची बहीण होलिका हिला आर्यांनी म्हणजेच भटा ब्राम्हणांनी कपट नीती ने बलात्कार करून भर चौकात संध्याकाळी रात्र झाल्यावर जिवंत जाळले तिच्या भवती चारीबाजूने लांब बाबू घेऊन ते तिला लाकडाच्या सरणातून बाहेर पडू देत नव्हते हे बघून गावातील लोक जोर जोराने ओरडत,बोबळत होते. त्यासरणात होलिका जळत होती, ब्राम्हण कोणालाच जवळ येऊ देत नव्हते.त्यामुळे परिसरात लोकांच्या मनात प्रचंड चीड होणार यांची खात्री असल्यामुळे आर्यांनी दुधात भंग टाकून चारीबाजूने माठ भरून ठेवले होते.लोक ओरडायला लागले की त्यांना तांबे भरून भांग पिण्यासाठी दिली जात होती.भांग पिलेला माणूस थोड्या वेळाने गुंगायला लागतो. सर्व विसरतो जिथे जागा भेटलं तेथे लुढकतो. ही पुराणिक कथा आहे.होळी जर चारित्र्य वान होती तर जाळली का जाते ?. आणि चारित्र्य हीन असेल तर तिची पूजा का केली जाते. ही परंपरा, रितीरिवाज किती वर्षांपासून दरवर्षी उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते.

होळी जाळल्या नंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन म्हणजे रंग पंचमी रंग लावण्याचा बहाण्याने मुली,महिलांच्या शरीराशी छेळाछेळी करणे आलेच,रंग कोणाला लावायचा यांची पूर्वजांनी अलिखित निमावली केली होती. वहिनी, नणंद, दीर भावजय,मामाची मुलगी,आत्याचा मुलगा अशी काही नात्यातील लोकांना धुलीवंदनाच्या म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी रंग लावण्याची रीत होती.आता ती पूर्णपणे बदलली दिसत आहे.आता स्वराचार,गलिच्छ तिरस्कार वाढवणारे प्रकार होत आहेत.
शहरात विविध जाती धर्माचे लोक चाळीत,सोसायटीत प्लॉट मध्ये एकत्र राहतात.तिथे एकत्र येण्याचे निमित्त पाहिजे असते.त्यात सकारात्मक विचारांचे उत्साहित लोकच भाग घेतात,आणि नकारात्मक विचारांचे लोक लांब राहण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना होळी,धूळवंदनाच्या निमित्ताने बरोबर टार्गेट केले जाते, “बुरा मत मानो भाई होळी है” असे म्हटले जाते.शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्यामुली मुलांच्या टार्गेट असतात.त्यामुळे विनयभंग हा सर्रास होत असतो. त्यालाच धुलीवंदन, रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा म्हणतात.हा प्रकार गल्लीबोळात होतांना दिसतो.

पुराण कथा सांगतात की होलिका प्रल्हादला मांडीवर बसुन जाळल्या गेली पण प्रल्हाद वाचून बाहेर आला नि होलिका जाळली,त्यांचा आनंद उत्सव दुसऱ्या दिवशी आर्यांनी रंग उधळून साजरा केला. होलिका म्हणजे एक राजाची बहन ,मुलगी तिला दहशत निर्माण करण्यासाठी भर चौकात लोकांच्या समोर जिवंत जाळली त्यामुळे ब्राह्मण किती भयानक मनोवृत्तीचे असतात हे दाखऊन देतात. दर पांच दहा वर्षात असे भयानक आघात समाजात परिणाम करणारे घडविले जातात त्यांचा मग सण, उत्सव साजरा केला जातो. अनेक संतांचे प्रगट दिन साजरा होतात,जन्म मृत्यू कुठे, कधी झाला हे सांगितले जात नाही.कोणी विचारण्याची हिंमत करत नाही. संत तुकाराम महाराज सारखे संत नदीत डुबकी मारून मारले जातात व पुष्पक विमानात बसुन वैकुंठाला गेल्याची रसभरीत कथा तयार केली जाते. पुढे गोविंद पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी सारखेच घडविले जाते त्यांचे शास्त्र, पुराण कथा लिहून त्यांना म्हणजेच सर्व हिंदूंना,मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजाला गुलाम बनवून ठेवले जाते तेच लोक असे सण उत्सव म्हणून साजरे करतात.

हे आजच्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, वायफाय वापरणाऱ्या जमान्यात लोक आंधळ्या सारखे होळी जाळून दुःख,नष्ट होण्याची अपेक्षा करतात. मुंबई ही भारताची औद्योगिक राजधानी म्हटल्या जाते.इथे अनेक देशाचे राज्यांचे लोक कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून एकत्र नोकरी करत असतात. त्यामुळेे सर्वांची चांगलीच मैत्री झाली असते. मराठी कामगार,कर्मचारी आणि अधिकारी होळी साजरी करण्यासाठी गांवी कोकणात सुट्टी टाकून जातात.मराठी कामगार, कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सुट्टी टाकून उत्सव साजरा करण्यासाठी गांवी जातात. कसा साजरा करतात हा उत्सव थोडक्यात सांगायच तर सुकी ओली लाकड एकत्र रचतात.दहा ते पंधरा फूट उंच आणि पंधरावीस फूटाची रुदी असलेला ओल्या सुक्या लाकडांचा ढीग मध्ये मध्ये सुके गवत लावून जो ढीग रचतो तीला होळी म्हणतात.या होळीची गांवात महिला एकत्र येऊन तिची पूजा करतात आणि मग या होळीला पेटविल्या जाते.आणि पेटणाऱ्या होळीच्या भोवती लोक बेबंद होऊन नाचतात,बोंबलतात.मोठा आनंद व्यक्त करतात.जसे आर्यांनी होलिकेला जाळले तसेच अनुकरण आजचे लोक करतात. ते न चुकता केले जाते. हे फक्त एकाच गावात नाही,तर राज्यातील प्रत्येक गावागावात होळी पेटवतात तेेव्हा करतात.

शहरात ही होळी लहान स्वरुपात असते पण गावात मोठी असते.या निमित्ताने कोकणात जाणा-या बसेस,रेल्वे प्रायव्हेट वाहनांना खूप गर्दी असते.लोक कुठे असतील तिथून आपल्या गावाकडे गर्दी चेंगराचेंगरी, टॉफिक जाम असतानां ही गाव गाठतात. बायको पोरांसह. नुसती लाकड जाळायला इतक्या लांबून लोक वाट्टेल तो खर्च,त्रास सहन करून गावाला जातात. या होळीत दुःख, दैन्य अज्ञान, भेदभाव,जाळून ते लोक होळी मातेकडे सुखा समृध्दीची शांतीची आरोग्याची मागणी करतात.
कोकणातीलच नाही एकूण मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांची होळीत दुःख जळली?. यांचा हिशेब आज पर्यत कोणी लिहला नाही.दैन्यही या होळीत जळते. म्हणजे दारीद्र्य नष्ट होते?. मग ते जळल्यावर गावातले किती लोक दारीद्र्य मूक्त झालीत?.अहंकार अज्ञानही जळते म्हणतात?. आज पर्यंत कोणा कोणाचा अहंकार, अज्ञान, दैन्य भेदभाव जळाला ते कोणीच सांगत नाहीत. गरीब श्रीमंतातला भेद जळतो?. काळा गोरा हा भेद जळतो ?. भारतात जातीयतेचा भयानक भेदभाव आहे तो जळतो ?. म्हणतात पण जळायला ते काय वस्तू आहे.हे कोणी मान्य करीत नाही.

अग्नीत लोखंड ही वितळवण्याची,भस्म करण्याची ताकद आहे.पण लोखंड ही वस्तू आहे.अहंकार,दुःख,दैन्य,अज्ञान, भेदभाव या कोणत्याही वस्तू नाहीत. हे आहेत माणसांच्या मनाचे रोग आहेत. माणसान निर्माण केलेल्या या व्यवस्था आहेत. एक तरी होळी दरिद्री माणसासाठी सुखसमृध्दी मागून त्याला सुखी करून गेल्याचा पुरावा म्हणून एखाद्या माणूस त्यांचे कुटुंब दाखवता येईल काय?.एकतरी कॅन्सरचा रोगी बरा झाल्याचे उदाहरण दाखवा?. असे लाकड जाळून अन देवळात लोळून घालून माणसाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक विकास आणि कल्याण झाले असते.तर भारतात भ्रष्टाचार,बलात्कार, जातीयता,राजकीय पक्षांची अंदाधुंदी माजलीच नसती. याचा अर्थ असाच आहे की हे सणवार कर्मकांड आणि देव थांबवू शकत नाही. हे सगळ थांबवतील फक्त आणि फक्त मानवतावादी विचारसरणी. मानवतावादी विचारसरणीचे लोक शासन प्रशासनात आणले पाहिजे. कर्मकांड आणि धर्मांध जातीयवादी लोक असतील तर असे उत्सव वाढत जातील.परंपरा रितीरिवाजाच्या नांवावर हिंसक वळण लागत आहे.

लैंगिकता, विनयभंग बलात्कार या सारखे एकतर्फी प्रेम वाढत जात आहेत. आजची पिढी सुशिक्षित आहे, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, फोरजी नेट,वायफाय वापरणारी असतांना ही परंपरा, रितीरिवाजाच्या नांवा खाली नवीन संकल्पना पुढे येत आहेत. होळी का जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन,रंगपंचमी का खेळली जाते.यांची माहिती दिली जात नाही. आजच्या पिढीला त्यांची गरज वाटत नाही. फक्त एन्जॉय करण्यासाठी निमित्त पाहिजे. म्हणूनच धुळीवंदन म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा झाली आहे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED