शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी मोदी सरकारला जाग येत नाही तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलने सुरु राहतील – आ. प्रणिती शिंदे

26

🔹शेतकरी आणि सर्वसामान्यांकड़े लक्ष द्यायला तयार नाही

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.28मार्च):-कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठि व वाढत्या पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरच्या दरवाढी, व कामगार विरोधी कायदयांच्या विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी व शेतकरी आंदोलनाला पाठिम्बा देण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे उपोषण करण्यात आले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की मोदी सरकार मनमानी कारभार करत असुन त्यांनी जो शेतकरी विरोधी कृषी विधेयके, कामगार कायदे पारित केले व सातत्याने पेट्रोल, डिझेल, आणि गैस सिलेंडरच्या दरात वाढ करत आहेत त्याच्या विरोधात देशभरात राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली उपोषण व आंदोलने सुरु असुन त्याच्याच एक भाग म्हणुन महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर काँग्रेसच्या मुख्यालयी उपोषण करण्यात येत आहे.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की शेतकरी आणि महिला या देशाचा कणा असुन त्यांना कृषी विधेयके व गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने इंधन, गैस सिलेंडरच्या दरवाढीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. गेले तीन महिन्यापेक्षा जास्त दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आत्तापर्यंत तीनशेच्या वर शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. पण मोदी सरकार लक्ष दयायला तयार नाही. उलट शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे काम करत आहे. या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना मिळणारा हमिभाव व बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असुन खासगी व्यापाऱ्यांना व उदयोजकांना शेतकऱ्यांची लूट करण्याची मुभा मिळणार आहे. कामगार विरोधी कायद्यामुळे लाखो लोक बेरोजगार होणार असुन कामगाराना त्यांच्या रोजगरापासुन हक्कापासुन वंचित ठेवण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

शेतकरी आंदोलन जेव्हापासुन पेटले आहे तेव्हापासून काँग्रेस पक्षाने शेतकरी आंदोलनाला पाठिम्बा दिला असुन, जोपर्यंत हे जुलमी कृषी विधेयके, कामगार विरोधी कायदे, तसेच पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरचे दरवाढ मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरु राहिल.

यावेळी सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, नगरसेवक रियाज हुंडेकरी, शिवलिंग कांबळे, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफ़ीक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, माजी महापौर अलकाताई राठोड, आरिफ शेख, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड़, बाबूराव म्हेत्रे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, हारुण शेख, भारत जाधव, उमेश सूरते, अशोक कलशेट्टी, संध्याताई काळे, पवन गायकवाड़, तिरुपती परकीपंडला, प्रवक्ते नागनाथ कदम, हसीब नदाफ, अंबादास गुत्तिकोंडा, केशव इंगळे, सुमन जाधव, मनीष गडदे, आझम सैफन, मकबूल मोहोळकर, यशवंत ढेपे, जाबीर अल्लोळी, अनुपम शहा, शौकत पठाण, अनिल मस्के, विवेक कन्ना, मणिकसिंग मैनावाले, अप्पासाहेब बगले, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, भोजराज पवार, युवराज जाधव, सोमनाथ व्हटकर, परशुराम सत्तारवाले, एजाज बागवान, पशुपति माशाळ, दशरथ गायकवाड़, सायमन गट्टू, राजाभाऊ महाडिक, विनाताई देवकते, अरुणा बेंजरपे, मोनिका सरकार, सुनीता व्होटकर, भाग्यश्री कदम, राजेन्द्र शिरकुल, शोहेब कडेचुर, नूर अहमद नालवार, शरद गुमटे, सलीम मनुरे, महेश मस्के, इसाक पुढारी, रवि हुंडेकरी, अनिता भालेराव, सुभाष वाघमारे, दिनानाथ शेळके, संजय गायकवाड़, रियाज नाइकवाडी, दीपक फुले, शकूर शेख, नागनाथ कोप्पा, अंबादास जाधव, सूर्यकांत शेरखाने, युवराज सानेभाऊ, राजेश झंपले, लतीफ शेख, श्रीकांत दासरी, जीशान सय्यद, आनंद भंडारे, मिजाज जहागिरदार, जे एम शिकलगार, सुरेखा घाडगे, मुमताज ताँबोळी, रंजना इरकर, जगदेवी कदम, चंदा काळे, राधा मोरखेड़े, बसंती सालुंखे, सुवर्णा सन्नाखे, वैशाली गरुड़, मुनिरबा शेख, संतोषी गुंडे, सुहासिनी मेनगाळकर, कुद्दुस शेख यांच्यासह नागरिक, शेतकरी, पदाधिकारी, सहभागी झाले होते.