जांब बाजार येथील स्वस्त धान्य दुकानात अजून धान्य वाटप चं नाही

26

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.28मार्च):- मार्च महिना संपत आला तरी सुद्धा जांब बाजार येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण झाले नाही. यामुळे शिधापत्रिकाधारक लाभार्थी वर उपासमारीची वेळ आली आहे, कोविड १९ मुळे हाती काम नाही आणि आता मार्च महिन्याचा शेवटचा हप्ता त्यात होळी असा महत्त्वाचा सण असताना लाभार्थी यांना त्यांच्या हक्काचे रेशन दुकानदार वेळेवर रेशन वाटप करत नसल्यामुळे शिधापत्रिका धारक यांच्यात प्रचंड नाराजगी दिसून येत आहे .

शिधापत्रिका असून काय उपयोग ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे . महिना संपत असताना दोन दिवस शिल्लक असताना दुकानदार रेशन वाटप करतो त्यामुळे स्वस्त धान्य दुकान वर प्रचंड गर्दी होते.आणि सोशल डीस्टर्स पालन होत नसुन . व नियमाच पालन करीत नसुन नागरिक आपला जीव धोक्यात घालून स्वस्त धान्य घेण्यासाठी दुकान वर झुंबड करत असतात .पुरवठा विभाग स्वस्त धान्य वेळेवर देत नाही की दुकानदार धान्य आणण्यास दिरंगाई करतो असा प्रश्न जांब बाजार येथील ग्रामस्थांना पडत आहे अशीच दिरंगाई होत राहिली तर सामान्य माणसाने काय करावे ? यात पुरवठा विभाग पुसद लक्ष्य घालून जनतेची समस्या सोडवेल का अशी चर्चा नागरिकांत दिसून येते आहे …??