✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धानोरा(दि.28मार्च):- तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायत येथील कटेझरी या गावी नविन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण मा. मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परीषद गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.कटेझरी येथील अंगणवाडी पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे तेथील महीला व लहान बालकांना त्रास सहन करावा लागत होता. त्याकरिता अंगणवाडीची अवस्था बघता, स्थानिकांनी जिल्हा परीषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन तेथील अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आली. त्याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केली.

यावेळी कटेझरी गावातील इतर समस्या बद्दल मनोहर पाटील पोरेटी यांच्याशी चर्चा केली.या प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य राजु जीवानी, जिल्हा परीषद सदस्य विनोद लेनगुरे, ग्रामपंचायत सरपंच गोपाल उईके, उपसरपंच भुमिकाबाई धुळसे, संजय गावडे, सदस्य राजु ठाकरे, माणिकचंद कोवे, रोशन बावणे, अनुसया मते, मारोतराव बावणे, पुंडलिक धुळसे, कृष्णाजी कुमरे, दिवाकर धुळसे, उमाकांत धुळसे, पंढरी धुळसे, उमाकांत धुळसे, कवडू धंदरे व गावातील महिला पुरुष व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED