✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.29मार्च):- तालुक्यातील कुंडलवाडी करोणाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे खबरदारी म्हणून विना मास्क फिरणाऱ्यावर कुंडलवाडी शहर पोलीस ठाणे पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांन्टे व पोलीस उपनिरीक्ष विशाल सुर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लग्नसमारंभ पार्ट्या, सभा, उत्सव यात्रा यावर्ती शासनाकडून नियम करण्यात आले आहेत. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर पडणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे, यामुळे कोरोना पुन्हा वाढू लागला आहे परिस्थिती चिंताजनक होण्या अगोदरच आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे.

आवश्यकता असेल तरच मास्क वापरून बाहेर पडणे,.सँनिटायझरचा वापर वेळोवेळी करणे, सोशल डिस्टन्स पाळणे,कार्यक्रम काही काळासाठी थांबवणे, पोलीस डॉक्टर आरोग्य सेवक,नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.जनतेने स्वयंप्रेरणेने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन सपोनि मान्टे व पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED