प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव अंतर्गत ४५४ जणांना कोरोनाची लस

34

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.29मार्च):-सध्या घडीला देशभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीकोरोनाची लस उपलब्ध करून दिले असून त्या अनुषंगाने देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एक महिन्यापासून लसीकरण देण्यात येत आहे.ही लस घेण्यासाठी सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना ही लस देण्यात येत आहे.

ही लस ४५४ जणांना दिली असून,या लसीचा कोणताच दुष्परिणाम नसल्याचे सांगण्यात आले आहे.तरी सर्व जनतेने ही लस घ्यावे असे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले.प्रतिक्रियाः लस दिल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम नसून हणेगावसह परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा तसेच ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे उपलब्ध आहेत.डॉ.शितल जाधव वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव.