पुसदच्या पत्रकाराला खंडाळा पोलिस स्टेशनच्या जमादाराने मारली थापड

31

🔺पुसद शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.29मार्च):-पोलीस स्टेशन खंडाळा येथील कार्यरत पोलीस जमादार नामे अर्जुन राठोड यांनी चापट मारून अपमानस्पद वागणुक देवून खोटया गुन्हयात गोविण्याचे धमकी दिली. या गंभीर बाबीची चौकशी होवुन कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वजा तक्रार यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

पुसद शहरातील गडी वार्ड येथे राहणारे सैय्यद आसीफ सैय्यद हमीद असे पत्रकार असल्याचे पिडीताचे नाव आहे. पुसद तालुक्यातील पत्रकार खंडाळा परीक्षेत्रांमध्ये नेहमीच वृत्त संकलन करण्यासाठी जातात. नेहमी प्रमाणे दि. २८ मार्च २०२१ रोजी सकाळी अंदाजे १०.३० वाजता वृत्त संकलन करिता पोलीस स्टेशन खंडाळा ता. पुसद येथे असता त्यावेळी पोलीस स्टेशन खंडाळा येथे इतर पोलीस कर्मचारी यांचे सह जमादार अर्जुन राठोड बक्कल नंबर २७५ हे देखील हजर होते. त्यावेळी अंजली ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर यांना दि. 27 मार्च रोजी मौजे रोहडा येथील काही लोकांनी गाडी रस्त्यावर अडवून मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाण झाल्याची तक्रार देण्याकरिता पिडीत ड्रायव्हर हे खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये आला होता.

त्यामुळे पत्रकार सैय्यद आसिफ त्या बाबत काय कार्यवाही करण्यात आली याची विचारणा वृत्त संकलनाचे निमीत्याने पोलीस जमादार अर्जुन राठोड यांना केली असता ते भयंकर चिडून गेले. व त्यांनी रागाचे भारात पत्रकार सैय्यद आसिफ यांचे गालावर चापट मारून खोटया गुन्हात गोविण्याचे धमकी देवून अतिश्य अपमानास्पद वागणुक देवून पोलीस स्टेशन मधून हाकलून लावले. सदरची संपुर्ण घटना ही पोलीस स्टेशन खंडाळा येथील सी.सी.टि.व्ही. कॅमे-या मध्ये कैद झालेली आहे. पोलीस स्टेशन खंडाळा येथील कार्यरत पोलीस जमादार अर्जुन राठोड यांनी त्यांचे पदाचा दुरूपयोग करून पत्रकाराला चापट मारून अपमानास्पद वागणुक देवून खोटया गुन्हयात गोविण्याची धमकी दिली आहे.

सैय्यद आसिफ पत्रकार असतांना देखील अश्या प्रकारे मारहाण होवून खोटया गुन्हात गोविण्याची धमकी दिली जात आहे, धक्कादायक प्रकार असून मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यात येते. तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल. सदरची बाब ही अतिश्य गंभीर स्वरूपाची असून मानवी हक्कास बाधा निर्माण करणारी आहे. त्यामुळे या संबंधाने यवतमाळ चे पोलिस अधीक्षकांनी त्वरीत दखल घेवून पोलीस स्टेशन खंडाळा येथील कार्यरत पोलीस जमादार अर्जुन राठोड यांचे विरूध्द ताबडतोब कठोर कार्यवाही करावी अन्यथा दुसरे पर्यायी कायदेशिर मार्गाचा अवलंब करावा लागेल असे तक्रारवजा निवेदनात सैय्यद आसिफ सैय्यद हमीद यांनी नमूद केले आहे.