✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.29मार्च):-समाज कल्याण जिल्हा परिषद विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून *दिव्यांग मित्र नांदेड* हे अॅप नव्याने विकसित करण्यात आले असून नांदेड येथे प्रस्तूत अॅपचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण श जिल्हाअधिकारी नांदेड यांच्या हस्ते ८ जुलै २० रोजी करण्यात आले आहे.

सदरील अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणी
नऊ फोल्डर वर सविस्तर माहिती भराता येत नाहि, अनेकांकडे मोबाईल नसते असला तर रिचार्ज नसते अशा अडचणी निर्माण होऊ नये एकही दिव्यांग वंचित राहू नये .
म्हणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी व दि.१ आँगस्ट ते १० आँगस्ट २० पर्यत छाननी व दि १५ आँगस्ट २० ला दिव्यांग बांधवांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळापञ देऊन सुध्दा वेळेत झाले नसल्याने दुसरे वेळापञक दि १०फ्रेबु २१ ते २५फ्रेबु २१ पर्यत गावपातळिवर ग्रामसेवक,तलाठी तालूका स्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी, आयुक्त साहेब महापालिका ईत्यादी अधिकारी यांना वेळापञक देऊनही वरिष्ठांचे आदेशाची अंमल बजावणी झाली नसल्याने मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिसर्‍या वेळी २२ मार्च पर्यंत दिव्यांग अँप पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये.

जर एकादा दिव्यांग वंचित राहिल्यास जबाबदार अधिकारी यांच्या वर कार्यवाही केली जाईल असे लेखी आदेश दहा महिन्यापासून वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची तोडी आदेशाची अंमलबजावणी व शासकिय दप्तर दिरंगाई व दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवणार्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करून दिव्यांगाना न्याय हक्क मिळेल काय? असे प्रसिध्दी पञक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, ज्ञानेश्वर नवले. राजु शेरकुरवार शंकर शिंदे. विठल बेलकर यादव फुलारी, मोहन कऊटकर सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर,रामकिसन कांबळे राहुल सोनुले,पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर, यांनी प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED