प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने साकारली पाणपोई

29

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.29मार्च):- सद्या जगभरात सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले असून,सर्वांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण कोरोनामुळे स्वतःची काळजी करत आहोत पण ऐन उन्हाळ्यात पक्ष्याची पण काळजी करायला पाहिजे. वाढत्या तापमानामुळे पशुपक्षी सैरभैर झाले असल्याने, त्यांची जीवाची सध्या फारच दैना होत असल्याने पोलीस स्टेशन बिटरगांव आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई उभारण्यात आली आहे. झाडावरती पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पिप्याची पाणपोई उभी केली.

पशू पक्षी यांना भर उन्हाळ्यात गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पाणपोई सुरू करताच चिऊताई लगेच पाणी पिण्यासाठी तिथे आली. जणू काय पोलीस स्टेशन बिटरगांव व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना पाणपोई मध्ये पाणी ठेवण्याची वाटच बघत होती.

🔸प्रतिक्रिया* :-जल है तो कल है, पाणी हे जीवन आहे, त्यासाठी प्रत्येक पशू पक्षी यांना पाणी मिळण्यासाठी प्रत्येकाने हा उपक्रम राबवावा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका अध्यक्ष उमरखेड मारोतराव गव्हाळे यांनी सांगितले.