महामार्गावरील झाडांची कत्तल, मग वृक्ष लागवड कधी?

33

🔺सार्वजनिक बांधकाम विभागाला संतप्त सवाल

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.29मार्च):– महाराष्ट्र सरकारने रस्ता रुंदिकरणाचे काम दोन – तिन वर्षापासुन सुरु केले आहे. काही महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे तर काही मार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या महामार्गावरील रुंदिकरणात जे निष्पाप वृक्ष सापडले आहेत त्या वृक्षाची बेसुमार कत्तल करण्यात आली. शासनाकडून लाखो झाडांवर कु-हाड चालवण्यात आली.त्यामुळे पर्यावरण संवर्धनावर मोठे संकट उभे झाले आहे. एकीकडे महाराष्ट्र वनविभागाने ५०कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट पुर्ण केले. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. तर दुसरीकडे रस्ता रुंदिकरणात सरकारने लाखो निष्पाप झाडांवर कु-हाड चालविली. रस्त्याच्या विकास व रुंदीकरण करण्यासाठी खुप जुने व अडथळा आणणारे झाडे तोडण्यात आले.

महामार्गावरील झाडांची कत्तल तर करण्यात आली पण अजूनपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुला व दुभाजक मध्ये वृक्ष लागवड केली नाही. त्यामुळे पर्यावरण संवर्धनावर मोठे संकट उभे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
——–

“सबंधित विभागाने रस्ता रुंदिकरणाच्या दोन्ही बाजुला व दुभाजकांवर वृक्ष लागवड न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.”- कवडू लोहकरे
(अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समिती
चिमुर)