✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.29मार्च):-सध्या घडीला महाराष्ट्रात कोरोना महामारीचा उद्रेक वाढत चालला असतानाच त्यामध्ये सगळ्यात जास्त पेशंट नांदेड जिल्ह्यात सापडत आहेत.त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारा-यांनी दि.२३/३/२०२१ पासून ४/४/२०२१ पर्यंत नांदेड जिल्हा लॉकडाऊन घोषित केले आहेत.तरी पण दिवसेंदिवस कोरोना पेशंटची संख्या वाढत चालली आहे.अशातच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागल्या पण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे.या निवडणुका मध्ये देगलूर तालुक्यातील दोन उमेदवार आहेत,एक कॉग्रेस प्रणित समर्थ सहकार पॕनलचे विजयसिंह बाळासाहेबजी देशमुख व दुसरे भाजपा प्रणित सहकार विकास पॕनलचे माधवराव पाटील सुगावकर हे आहेत.

विजयसिंह बाळासाहेब देशमुख हे या बँकेचे माजी संचालक व कॉग्रेसचे नेते कै.बाळासाहेब किशनरावजी देशमुख यांचे चिरंजीव आहेत व सध्या घडीला कॉग्रेस पक्षाचे देगलूर तालुकाध्यक्ष ॲड.प्रितमजी देशमुख यांचे मोठे बंधू आहेत,व माधवराव पाटील सुगावकर हे माजी जि.प.उपाध्यक्ष मा.रमेश दिगंबरराव देशमुख शिळवणीकर यांचे मावस भाऊ आहेत.हणेगाव भागात कै,बाळासाहेब देशमुख यांचे मोठे योगदान व गोरगरीबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे तसेच या बँकेचे संचालक असताना भरपूर लोकांना बँकेत नोकरी लावून दिले तसेच या बँकेचा फायदा करून दिला व या परिसरातील जनतेमध्ये आपला दबदबा कायम राखला.त्यामुळे हणेगाव,मरखेल,खानापूर,शहापूर सर्कल हे विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

तर माधवराव पाटील सुगावकर हे मागील पाच वर्षापूर्वी शिवाजिराव देशमुख बळेगावकर यांच्या विरोधात लढले असता दोघांनाही सारखेच मते पडल्याने निवडून अधिकाऱ्यांनी टॉस उधळून मतदान घेतले असता त्यात शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांचा विजय झाला होता.त्यावेळेसचा बदला घेण्यासाठी माधवराव पाटलांनी यावेळी खूप मोठ्या अपेक्षेने रिंगणात उतरून या निवडणुकीला वेगळी वळण आणून सोडली आहे.त्यांच्या सोबत मरखेलचे जि.प.सदस्य भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी जोरदार तयारी करत आहेत तर विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांच्या बाजूने हणेगाव गणाचे जि.प.सदस्य पती व ग्रा.पं.सदस्य दिलीप बंदखडके यांनी जोरदार तयारी केली आहे.पण सद्या सोसायटीचे चेअरमन हवालदील झाले आहेत की रोज दोन्ही गटाचे उमेदवार येऊन गाठीभेटी वाढवत आहेत व त्यांच्या नातलगाना सांगून पाठवत आहेत.त्यासाठी ही लढत दोघांनाही प्रतिष्ठेची बनली आहे.त्यासाठी या निवडणुकाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.येत्या दोन दिवसात म्हणजे दि.२/४/२०२१ रोजी मतदान असल्यामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे व सर्व चेअरमनचे चित्र उघडे होतील.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED