✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.29मार्च):-जिल्ह्यात मागील 24 तासात 127 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 173 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 438 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 937 झाली आहे. सध्या 2077 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 71 हजार 557 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 40 हजार 133 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये राजूरा येथील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 424 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 384, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 173 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 76, चंद्रपूर तालुका आठ, बल्लारपूर नऊ, भद्रावती 26, ब्रम्हपुरी चार, नागभीड एक, मूल चार, सावली एक, गोंडपिपरी एक, राजूरा सहा, चिमूर 13, वरोरा 21 व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज(29 मार्च) नव्याने 41 कोरोनामुक्त तर एका मृत्यूसह इतर 28 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.29 मार्च): जिल्हयात एकूण कोरोना बाधितांपैकी कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा 10 हजार पूर्ण झाला. आज जिल्हयात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच 28 नवीन कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकूण बाधित 10518 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10,00,1 वर पोहचली. तसेच सद्या 407 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 110 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.87 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 28 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 1, एटापल्ली तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 24,अहेरी 4, आरमोरी 2, भामरागड 04, धानोरा 1, एटापल्ली 01, मुलचेरा 01, कुरखेडा 01, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन 28 बाधितांमध्ये अहेरी तारलुक्यातील आलापल्ली 2 तर शहरातील 1 जण आहे. आरमोरी मधील 4 सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी मधील एक मार्कंडा येथील आहे. एटापल्ली दोघेही स्थानिक आहेत. गडचिरोली मधील जीएनएम होस्टेल जवळ 1, रोज टावर अपार्टमेंट जवळ 1, गोकूळ नगर 1, चामोर्शी रोड 1, इतर जिल्हयातील 1, प्रियांका हायस्कूल कनेरी जवळ 5, कारगील चौक 1, महिला महाविद्यालय जवळ 1, आनंद नगर 3, साईनगर 1, पोस्ट ऑफिस जवळ 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा मधील एकजण गर्नोली येथील आहे.

**

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, गडचिरोली, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED