✒️विजय केदारे(विषेश प्रतिनिधी)

अकोले(दि.30मार्च):- तालुक्यातील विरगाव येथील  शेततळ्यात बुडून बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,कृष्णकांत जगननाथ थोरात वय 43 आणि आश्विनी कृष्णकांत थोरात वय 16 या दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय,ही घटना आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  सुपारमाळ परिसरात घडली,आपली मुलगी अश्विनी ही शेततळ्यातील  पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी गेलेल्या कृष्णकांत थोरात यांचा ही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दोघांचे ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून,या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे,मयत आश्विनी ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. अकोले पोलिसांनी पंचनामा केला असून अकोले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार स्वतः चौकशी करीत आहे

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED