साहित्य समाज जीवनाचा आरसा असून त्यात त्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.30मार्च):-साहित्य समाजजीवनाचा आरसा असून त्यात त्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून नवी पिढी आदर्श विचारांनी घडविण्याचे कार्य तो प्रामाणिकपणे करीत असतो. त्याकरिता शालेय स्तरावर उपक्रमाचे आयोजन आणि त्यासंबंधी लेखन ही करीत असतो. ह्या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत शिक्षकाद्वारा निर्मित साहित्यकृती ला सक्षम विचारपीठ देण्याचे कार्य रयतेचा वाली हे डिजीटल दैनिक करीत आहे. आजच्या धकाधकीच्या काळात असे शैक्षणिक दैनिक चालवणे फार कठीण असते. ते कठीण काम लिलया पार पाडणारे संपादक शाहु भारती सर आणि त्यांची संपूर्ण टीम कौतुकास पात्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर ) यांनी केले.

ते रयतेचा वाली या डिजीटल दैनिकाच्या आॕनलाईन विमोचन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी वादळकार प्रा. राजेंद्र सोनवणे यांनीही ह्या सातत्यपूर्ण सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून ह्या परिवारात सर्वांनीच जुडावे आणि आपआपल्या पध्दतीने योगदान द्यावे , असेही ते म्हणाले .

यावेळी मिठ्ठू आंधळे,अविनाश पाटील,केशव ठोंबरे,स्मिता कापसे,जयश्री क्षीरसाठ,सुनिता इंगळे,नारायण भिलाने,संतोष लिगायत,विनोद पाटील, श्रीरंग अवचरमोल,राजेंद्र लाड,दामोदर डहाळे,दिपक भुजबळ,अरुण कराळे,ज्ञानेश्वर औताडे इ.अनेक प्रतिनिधी संपूर्ण महाराष्टातून आॅनलाईन उपस्थित होते.
यावेळी रयतेचा वाली ची भूमिका प्रस्तावनेमध्ये मुख्यसंपादक शाहू भारती यांनी मांडली.प्रमुख पाहुणेचा परीचय प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी करुन दिली.ग्रामगीताचार्य यांच्या शुभहस्ते दैनिक रयतेचा वाली पाचशे अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.व प्रतिनिधींना आयकार्ड ही प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूञसंचालन अविनाश पाटील यांनी केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी रयतेचा वाली ची वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केली.