पो.स्टे.पुसद ग्रामीण च्या कार्यक्षेतात अवैद्य व्यवसायाचा हैदोस

30

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.30मार्च):- ग्रामीण पो.स्टे.च्या कार्यक्षेत्रातील ,जांब बाजार हे अतिसंवेदनशील गाव आहे. या अतिसंवेदनशिल गावांमध्ये पो.स्टे पुसद ग्रामीण च्या अर्थपूर्ण संबंधा मधून अवैद्य व्यवसायाची रेलचेल पहावयास मिळते. राजरोसपणे वरळी मटका, जुगार, विविध अवैद्य व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. जुगार खेळणाऱ्या जुगारींवर पोलिसांचा कोणत्याच प्रकारचा वचक राहिलेला नसुन.पो.स्टे.पुसद ग्रामिन अर्थपूर्ण हितसंबंध जोपासून खुलेआम जुगाराला प्रोत्साहन देत असल्यामुळेच अवैध व्यवसायाची रेलचेल आहे अशी भावना सर्व साधारण नागरिक व्यक्त करित आहेत.

नुकतीच जांबबाजार येथे खुलेआम वरळी मटका असल्याची माहीती स्थानिक नागरिकांला दिसून येत आहे.परंतु पोलिसांना व स्थानिक बिट जमादार कां दिसत नाही. बीट जमादार त्यांच्यासोबत अर्थपूर्ण हित जोपासून वरळी मटका ची पाढराखण करीत आहे की काय ? असा प्रश्न सामान्य माणसाला ला पडत आहे . यवतमाळ जिल्ह्यात सध्या कोरोना महामारी मुळे लॉकडाउन सुरु आहे. व बरेच लोकांना रोजमजुरी नसल्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत खुलेआम मटका सुरू असल्याने बरेच लोक मटक्याचे शौकीन झाल्याने त्यांचे परिवार उध्वस्त होण्याची मार्गी लागले आहे. यात शाळकरी मुला ,मुली ,व महिला सुध्दा वरळी मटक्याचे शौकीन झाले आहेत. मा.पोलीस अधिक्षक यांनी यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे संपूर्ण पणे बंद करावे असे सर्व जवाबदार अधिकाऱ्यांना सुचित केले होते. असे आदेश अस्तांना जांबबाजार येथे खुलेआम वरळी मटका राजरोसपणे सुरू ढेवण्या मागे कोणाचा आशिर्वाद आहे. अशी परिसरात जोरदार खमंग चर्चा आहे.

पो.स्टे.पुसद ग्रामिन सोबत अर्थपुर्ण हित सांभाळा आणि राजरोसपणे अवैद्य व्यवसाय चालवा असे जांबबाजार परिसरातिल नागरिकांमध्ये चर्चिला उत आला आहे. पो.स्टे.पुसद ग्रामिन ठाणेदार यांच्याकडे संबंधित बीट जमादार अवैद्य व्यावसायिकांचे हित संबोधित करुन अवैध धंदे वाल्या ची पाढराखण करीत आहे.बीट जमादार अवैध धंदे वर कार्यवाही करण्यास असमर्थ असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात य़ावी.व सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी गावकऱ्यात जोर धरत आहे. पो.स्टे.पुसद ग्रामीण कार्यक्षेत्रातील , जांब बाजार लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये राजरोशपणे खुलेआम वरली मटका,जुगाराची रेलचेल पाहावयास मिळते असे जनमानसात बोलल्या जात आहे.? राजरोसपणे सुरू असलेल्या वरळी मटका, जुगारात शाळकरी मुलेसुद्धा गुरफटल्या जातअसल्याची भीती नागरिकात व्यक्त केल्या जात आहे.

पो.स्टे. पुसद ग्रामीण मात्र अवैद्य व्यवसायिकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासून सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांकडून आरोप केल्या जात आहे. वरिष्ठांनी पो.स्टे.पुसद ग्रामीण च्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायावर लगाम लावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरीत आहे.