युवकाने गळफांस लावून आत्महत्या केल्याची

23

हिंगणघाट पोलीस वार्ता

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.३०मार्च):-स्थानिक शास्त्री वार्ड येथील अनिरूद्ध रामदास ताकसांडे (२०) या युवकाने काल सायंकाळी गळफांस लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली.
सदर घटना दि.२९ रोजी घडली असून मृतक हा अविवाहित होता.स्थानिक कापडदुकानात काम करीत असल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मृतकाचे वडील रामदास सुखदेव ताकसांडे यांनी हिंगणघाट पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
——-

🔺आपसी वादातून दगडाने केली मारहाण

आपसी वादविवादातुन झालेल्या भांडणात चेतन मोतिराम ढाले(३२) यास चार जनांनी दगड़ाने मारहाण केल्याची घटना काल सोमवार रोजी शहरातील संत चोखोबा वार्ड येथे घडली.
फिर्यादि चेतन ढाले याचे व कांबळे परिवारातील सदस्यांमधे जुना आपसी वाद होता, काल रंगपंचमीचे दिवशी वचपा काढण्याचे उद्देशाने आरोपी तेजस कांबळे,आकाश कांबळे, बंटी कांबळे ,चोचो कांबले यांनी फिर्यादिवर दगड़ाने प्रहार करीत गंभीर जखमी केले.
हिंगणघाट पोलिसांनी तक्रारीवरुन भादंवी कलम ४२४,४३ अन्वये गुन्हा नोंदविला.

—–

🔺भांडणात मध्यस्थी करणाऱ्या युवकावर रॉडने केला हल्ला

भांडणाचे वेळी मध्यस्थी करणाऱ्या युवकावर रॉडने हल्ला केल्याची घटना काल स्थानिक मुजुमदार वार्ड येथे घडली.
काल दि.२९ रोजी प्रशांत राऊत या युवकासोबत आरोपी सोनु प्रधान,सुमित राऊत,आकाश भोसकर,आकाश खुळसंगे यांनी संगनमताने भांडण करीत लोखंडी रॉडने हल्ला केला.यादरम्यान भांडण सोडविण्याकरीता गेलेल्या प्रशांत राऊत या युवकाससुद्धा लोखंडी रॉडने हल्ला करीत गंभीर जखमी केले.फिर्यादि नितीन मनोहर राऊत याचे तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी भादंवी कलम ३२४,५०६,३४ नुसार गुन्हा नोंद करीत कारवाई केली.