✒️फलटण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

फलटण(दि.31मार्च):-प्रकाश जावडेकर, पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार यांनी दि. ३०.३.२०२१ रोजी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र शासन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री; रणजितसिंह नाईक निंबाळकर, माननीय खासदार (लोकसभा), गिरीश बापट, माननीय खासदार (लोकसभा), श्रीनिवास पाटील, माननीय खासदार (लोकसभा) उदयनराजे भोसले, माननीय खासदार (राज्यसभा), चंद्रकांत (दादा) पाटील, सुनील कांबळे, माननीय आमदार आणि नीता नेवासे, नगराध्यक्षा, फलटण या प्रसंगी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाल्या.

सुनीत शर्मा, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड; पुनेंदू मिश्रा, सदस्य (परीचालन व व्यवसाय विकास -ओ अँड बी डी), रेल्वे बोर्ड, नवी दिल्लीहून सामील झाले.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी स्वागत केले.

प्रकाश जावडेकर यावेळी बोलताना म्हणाले की, माननीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसतात.  बायो-टॉयलेट्सच्या परिचयामुळे ट्रॅक आणि स्टेशन प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत.  स्वच्छ भारत यांचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

 रेल्वेमंत्री म्हणून पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात आयआरसीटीसी वरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकिटे जलद मिळण्यास मदत झाली असेही त्यांनी नमूद केले.  सर्वोच्च मानकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित रेल्वेमार्ग क्रॉसिंगचे उच्चाटन, विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण,  रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था व विकासाला चालना मिळाली आहे.  ५००० हून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वर्ल्ड वाईड वेबवर जाता येईल आणि त्यांचे ज्ञानाचे क्षितिज उघडले जाईल.

 फलटण-पुणे डेमू ट्रेन : पार्श्वभूमी
फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल.

रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे आणि पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे.

यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टीवीटी मिळेल.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED