संजय पाटील यांच्या मध्यस्थीने पंढरपूर राष्ट्रवादीचा वाद मिटला

37

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.31मार्च):-पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवारात गेल्या महिन्याभरापासून असलेल्या मतभेदांना आज तिलांजली देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून मतभेद सुरू होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सुरेश भाऊ घुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालले ले मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय संजय भाऊ पाटील यांना निरीक्षणासाठी पंढरपूर येथे पाठवण्यात आले होते या बैठकीमध्ये माननीय संजय भाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच कार्यकर्त्यांमध्ये चालली घालमेल दूर करून कार्यकर्त्यांचा अहवाल निरीक्षणासाठी सुरेश भाऊ घुले यांना देण्यात आला.

त्याच निरीक्षणाचा अहवाल वाचून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षनिरीक्षक सुरेश भाऊ घुले जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्याशी चर्चा करून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद दूर करण्यात निरीक्षक संजय पाटील यांच्या निरीक्षणानेअखेर यश आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन मतभेद दूर केले त्यामुळे विठ्ठल परिवारात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून गेल्या महिन्याभरापासून मोठा वाद निर्माण झाला होता विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके संचालक युवराज पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पवार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांच्यातील हा वाद पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पर्यंत गेला होता.

विधानसभा पोटनिवडणूकीत या वादाचा पक्षाच्या विजयावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हे मतभेद दूर करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून प्रयत्न सुरू होते आज दिनांक ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नामदार जयंत पाटील पंढरपूर दौर्‍यावर आले आहेत या वेळी त्यांनी विठ्ठल हॉस्पिटल येथे या सर्व पदाधिकाऱ्याशी चर्चा केली यावेळी बंद खोलीत या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांच्यातील वाद मिटविण्यात आले बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर सर्व पदाधिकारी खुल्या दिलाने बाहेर आले आणि नामदार जयंत पाटील यांचा सत्कार केला तसेच एकत्र फोटो काढून मतभेद मिटल्याचे जाहीर केले अंतर्गत मतभेद मिटले याचे वृत्त तालुक्या मध्ये वाऱ्यासारखे पसरले आणि काार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला