अवैध दारुने घेतला बळी

25

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.31मार्च):-एका इसमाने अवैध दारूचे अतीसेवन केल्याने काल सायंकाळी स्थानिक चोखोबा वार्ड येथील ४२ वर्षीय इसमाचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार रमेश भगत (४२) रा.चोखोबा वार्ड हा नेहमीच दारूचे सेवन करायचा, दारूचे अतीसेवनामुळे काल मंगळवार रोजी त्याला फिट आली,त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान काल मंगळवारी दुर्दैवी मृत्यु झाला.

सदर इसम विवाहित असून त्याला १ मुलगा,१ मुलगी,पत्नी असा परिवार आहे.शहरात प्रत्येक भागात अवैध दारूविक्री खुलेआम सुरु असून मृतक हा दारुचा बळी ठरला आहे.पोलिसांनीसुद्धा अवैध धंद्याप्रती बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास येत आहे.ऐन होळीच्या हंगामातसुद्धा शहरातच नव्हे तर तालुक्यातसुद्धा दारू ठिकठिकाणी सहज उपलब्ध होती.

हिंगणघाट तालुका हे ठोक व खुर्दा दारूविक्रीचे केंद्र म्हणून अलिकडे नावारूपास आले असून पोलिसांचे आशीर्वादानेच सुरु आहे.गेल्या २ महिन्यापुर्वी ना.अनिल देशमुख अवैध दारूविक्री व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रशासनाला तंबी दिली होती,परंतु गृहमंत्रीसुद्धा आता हे विसरल्याचे दिसुन येत आहे.
मृतक रमेश भगत हा या अवैध दारूचाच बळी ठरला असून लोकप्रतीनिधी तसेच सामाजिक संघटनांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.