✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवडमाण)मो:-9075686100

म्हसवड(दि.31मार्च):-शिंदी बु. गट नंबर ६००पूर्वीचे सर्वे नं, १६९ व १७१ ) क्षेत्र १४ हे. ४२ आर. हि जमीन शिंदी बुद्रुक येथील सर्व खातेदारांची असून या मधील सुमारे ९ एकर क्षेत्र तुपेवाडी लघुपाटबंधारे करीत अधिग्रहण झाले असून याचे मोबदला आज अखेर या सामायिक गटाची आणेवारी जुळत नसलेने मिळला नसून  पूर्वी पासून ते सन २०१२ पर्यंत शिंदी बु येथील गट नंबर ६०० मध्ये ज्यांच्या नावाची कोणती हि नोंद नव्हती अशा खातेदारांची सन २०१२ साली तत्कालीन गाव कामगार तलाठी मौजे शिंदी बु यांनी सुमारे ९७ गुंठे क्षेत्राची वाढीव नोंद फेरफार अथवा कोणत्या हि कायदेशीर दस्त ऐवजाशिवाय काहींनी दिलेल्या आर्थिक अमिषास बळी पडून मूळ गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी वाढीव क्षेत्राचा अंमल दिला आहे.

यामुळे इतर अनेकांचे हक्कावर गदा आली आहे. या संबंधित तत्कालीन तलाठी यांचे कार्यकाळात भ्र्ष्टाचार करून असे सरकारी रेकॉर्ड मध्ये महसुली अधिनियमाचे उल्लंघन करून अनेक चुकीचे बदल केलेचे उघड झाले आहे. याकामी मा. उपविभागीय अधिकरी यांचे आदेशावरून तहसीलदार दहिवडी यांचे मार्फत चौकशी सुद्धा कार्यन्वयित झाली होती या चौकशी मध्ये या पोकळ नोंदी उघड झाल्या आहेत.

वास्तविक “७ / १२ अधिकार अभिलेख” व “फेरफार नोंदवही ” हे गाव चे प्रमुख अधिकार अभिलेख असून यातच काही अमिषा पोटी भ्र्ष्टाचार करून मूळ अधिकार अभिलेख नियमबाह्य बदलणाऱ्या तत्कालीन गाव कामगार तलाठी यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांना हे बेकायदेशीर काम करण्यास भाग पडणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून शिंदी बुद्रुक येथील गट नंबर ६०० चे ७ / १२ रेकॉर्ड तात्काळ दुरुस्त करून मिळावे तसेच शिंदी बुद्रुक येथील या गट नंबर ६०० मधील सर्व अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण व पंचायत समिती दहिवडी यांची सुद्धा बनावट कागदपत्र सादर करून फसवणूक करून बांधकाम करणेत आलेले अतिक्रमित घरकुल तात्काळ हटविण्यात यावे व सर्व मूळ खातेदार याना त्यांचा हक्क मिळवून द्यावा अशी विनंती मा. उपविभागीय आधिकारी सो दहिवडी याना करणेत आली.

यावर चुकीच्या महसुली नोंदी वर कारवाई करून अधिग्रहित क्षेत्राचा मोबदला मिळवून देणेचे आश्वासन मा उपविभागीय आधिकारी सो दहिवडी यांनी दिले. दरम्यान या प्रश्नी प्रशासनाकडे गेले अनेक वर्ष सनदशीर दाद मागून देखील कोणती हि उचित कारवाई होत नसलेने येत्या ८ दिवसात संबंधित पोकळ नोंदी व अतिक्रमणधारकांचे अनुषंगाने कारवाई न झालेस उपविभागीय आधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असेलचे वंचित खातेदारांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी भास्कर खरात, सूर्यकांत खरात , शंकर खरात , भीमराव खरात छाया खरात आदी उपस्तिथ होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED