बिलोली तालुक्यात कुटुंब शस्त्रक्रिया नियोजनाबाबत पुरुषांची अनास्था

39

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-997063132

बिलोली(दि.31मार्च):- तालुक्यात बिलोली तालुक्यातील कुटुंब नियोजनाबाबत महिलांच्या तुलनेत पुरुषांचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नगण्य असल्याने पुरुष मंडळींच्या मनात अजूनही नसबंदी बाबत गैरसमज दूर झालेले नाहीत. बिलोलीतालुक्यात कुंडलवाडी,सगरोळी,लोहगाव,शंकरनगर, खतगाव अशी 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.या दवाखान्या अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2020 ते आजतगायत तालुक्यात खतगाव,लोहगाव वगळता बाकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्याची सोय आहे. एका वर्षात कुंडलवाडी येथे 477, सगरोळीत 586 शंकरनगरमध्ये 168 अशी एकुण 1231 महीलांची नसबंदी करण्यात आली.महीलांच्या तुलनेत केवळ 2 पूरूषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली.

बाळंतपणाच्या असाह्य वेदना सहन करीत महीला लगेच नसबंदी शस्त्रक्रियसाठी सज्ज असतातच यासाठी सज्ज महिलांचा पुढाकार असतो.आणीबाणीचा काळ वगळता बाकीच्या काळात महीलांची शस्त्रक्रिया जास्त झाल्याचे दरवर्षीच्या आकडेवारीवरून लक्षात येते.महीलांच्या तुलनेत पुरूष मात्र शस्त्रक्रिया करून घेण्यात मागे असतात. यासाठी आरोग्य विभागाकडून पुरुषांच्या नसबंदीसाठी म्हणावी तेवढी जन जागृती होताना दिसत नाही.

तर याबाबत काही महीला व पूरूषांशी चर्चा केली असता नसबंदी केल्या नंतर कष्टाची अंगमेहनतीची कामे होत नाहीत.असा समाजात गैर समज पसरलेला आहे.महीलांच्या नसबंदीसाठी शासनाकडून तोकडे अनुदान मिळते तर पुरुषांना पंधराशे रुपये अनुदानमिळते. पुरुषांची शस्त्रक्रिया दहा मिनिटात संपते ते अंगमेहनतीची कामे करू शकतात असे सगरोळीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमवाड यांनी स्पष्ट केले आहे.