कोरोनावर मात करणाऱ्या ९3 वर्षीय आजींची कमाल

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.31मार्च):-संपूर्ण जगावर कोरोनाने आपला विळखा घातला आहे. त्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोणी आपले वडील गमावले, कोणी आपली आई तर कोणी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. पण या जगात असेही लोक आहेत की कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या घरी परतत आहेत. अशाच एका 93वर्षाच्या मायमाऊलीने या कोरोना व्हायरसवर मात केली आहे.

पुसद शहरातील नवीन पुसद येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभावती .ता. काळीकर या १० दिवसानंतर कोरोनवर मात करीत सुखरूप घरी पोहचल्या आहेत. याचे श्रेय ती घरातील सर्व सद्स्य व जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळ मधील सर्व स्टाफ व डॉक्टरांना देते तिथे तिची खूप योग्य प्रकारे काळजी घेतली असे देखील ती आवर्जून सांगते.कोरोना ला घाबरू नका व तसेच या काळात सर्वानी आपल्या कुटूंबाची काळजी घ्या असे आजी कळकळीने जनतेसमोर आव्हान करते .