रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी दुग्ध व पशुसवर्धन मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

34
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण) मोबा.9075686100

म्हसवड(दि.1एप्रिल):-राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाई जगनाथ जानकर(वय 92) याचे वृद्धापकाळाने त्याच्या गावी पळसावडे,ता.माण येथे निधन झाले त्याच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले त्यांनी एक मुलगा राज्याचा मंत्रीपण झाला याचे सर्व श्रेय त्यांना जाते.त्यांनी दाखवून दिले की गरिबी जरी असली तरी जिद्द असल्यास सर्व काही साध्य होते. त्याच्या जाण्याने पळसावडे गावास तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.