✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो.नं.९९७०६३१३३२

बिलोली(दि.1):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील विविध सेवा सहकारी सोसायटीची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईन पध्दतीने पार पडली.दिनांक 31 मार्च 2021 रोजी सोसायटीचे चेअरमन साईनाथ गोविंदू उत्तरवार यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या दालनात पार पडले असुन यावर्षीचा निव्वळ नफा 1,76941 रूपये नफा झाल्याची माहीती चेअरमन साईनाथ उतरवार यांनी सत्यप्रभाशी बोलताना व्यक्त केली.

यावेळी मा.नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार,सहायक निबंधक रमेश कांबळे,कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर,व्हाईस चेअरमन सयाराम नरावाड,संचालक रमेश भोरे,लक्ष्मण होरके,भुमन्ना ठक्कुरवार,हनमनलु गोनेलवार,पोशेट्टी कोमुलवार,किशन लाड,पोशेट्टी ईज्जमवार,संजय रामपूरे,शांताबाई मामीडवार,मँनेजर रामराव रत्नागिरे,सभासद हणमंत रत्नागिरे,सायलु मामीडवार,सेवानिवृत प्रा.जयप्रकाश कमटलवार,संजय कोटलावार,डॉ.प्रशांत सब्बनवार आदी उपस्थित होते.एका वर्षाचे अहवालाचे वाचन मँनेजर रामराव रत्नागिरे यांनी केले,तर अर्थिक पत्रकाचे वाचन मिनाक्षी लाडे यांनी केले.या सभेचे प्रस्ताविक संजय रामपूरे यांनी केले.यावेळी सभेस मार्गदर्शन साईनाथ उतरवार,सहायक निबंधक रमेश कांबळे यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED