✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.2एप्रिल):-जिल्हाधिकारी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांनी आज शहरात भेट देऊन कोरोना प्रतिबंधक मोहिमेचा आढावा घेतला.शहरासह ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी तसेच सरपंच यांच्या भेटी घेऊन लसिकरण मोहिमेस वेग देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती देशभ्रतार यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी हिंगणघाट पंचायत समिति सभागृहात ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला.

यावेळी तालुक्यातील शेगांव(कुंड)येथील सरपंच राजू नगराळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जनजागृती करीत मोठ्या प्रमाणात लसिकरण करवून घेतल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे,उपसभापती अमोल गायकवाड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले,गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे,जि.प.सदस्य नितीन मडावी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

कोविड प्रतिबंधक लसिकरण वाढविण्यासाठी तसेच कोरोना चाचण्या जास्तीतजास्त करण्यात याव्या यासाठी आरोग्य विभाग तसेच प्रशासकीय विशेष लक्ष देऊन यासाठी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात लसिकरणासाठी नागरिकांना वाहनसुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधिताना दिली.नागरीकांनी मास्क न वापरता घराबाहेर पडू नये,सामाजिक दुरता पाळणे याकड़े याकड़े विशेष लक्ष देण्यात येणार असून सैनीटायझरचा वापर किंवा वारंवार हात स्वच्छ करण्याच्या सुचना देत सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाणात सोय करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले.शहरातील कोविड लसिकरण मोहिमेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानीय नगरपरिषद कार्यालयात आढावा सभा घेतली.

यावेळी नगरपरिषद अध्यक्ष प्रेम बसंतानी,उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,मुख्याधिकारी अनिल जगताप,वैद्यकीय अधिक्षक किशोर चाचरकर इत्यादीसह नगरसेवक मंडळी उपस्थित होती.मास्कचा वापर न करणाऱ्यांना शहरात यापुर्वी २०० रुपये दंड करण्यात येत होता.परंतु आजपासून हा दंड रुपये ५०० प्रमाणे वसुल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी दिली.

कोरोनाबाधित झालेल्या घरिच उपचार (होम आयसोलेशन)घेणाऱ्या रुग्णाकड़े आंगनवाड़ी सेविका,आरोग्य कर्मचारी,शिक्षक यांचे माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून शहरातील लसिकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांना जवळच्या कोविड लसिकरण केंद्रात जाण्यासाठी पालिकेच्यावतीने वाहन सुविधासुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे,लसिकरण घेऊ इच्छिणाऱ्या नागरीकांनी संबंधित प्रभागातील नगरसेवकांशी वाहनसुविधेकरीता संपर्क साधन्याचे आवाहन मुख्याधिकारी जगताप यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED