दऱ्या खोऱ्यातील मावळ्यांचे संघटन करून छ. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले-प्रा.अतुल दुबे

25

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.2एप्रिल):-दऱ्या खोऱ्यातील आणि गाव खेड्यातील मावळ्यांचे संघटन करून या मावळ्या मध्ये निष्ठा आणि स्वराज्य स्थापनेची पेरणी करून आदिलशाही,निजामशाही,
बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा देत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले असे मनोगत भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी मौजे लोणारवाडी येथील मावळे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलेमावळे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मौजे लोणारवाडी येथे शिवजयंती कोरोनाचे सावट असल्यामुळे दिनांक 1 एप्रिल रोजी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

लोणारवाडी येथे आई तुळजाभवानी,राजमाता जिजाऊ माँ साहेब, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व .बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन
भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, मावळे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबन ढेंबरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनिष जोशी, मारोतरावआटपळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मावळे शिवजयंती उत्सव समितीचे संभाजी आटपळकर,जगन्नाथ तुपसौंदर,विष्णु खांडेकर, संजय आटपळकर, पप्पू ढंगेकर,गणेश ढंगेकर, जालिंदर फड, महादेव ढेंबरे, प्रशांत ढेंबरे, नागनाथ खांडेकर, निखिल ढेंबरे आदि सह गावातील शिवप्रेमी उपस्थित होते.