नागणी ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-९९७०६३१३२

बिलोली(दि.2एप्रिल):- तालुक्यातील नागणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शिक्षणासाठी लागणारे सर्व डिजीटल शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,झेरॉक्स मशीन १ ,व्हाईट बोर्ड ५ ,ब्याटरी200mb व इन्व्हर्टर १, प्रोजेक्टर१,सिंगल आसन,कपाट ३, धान्य कोटी ५,फायबर खुर्ची ६,पंखा ३, कॉम्पुटर १,साहीत्य ठेवण्यासाठी ट्रे १, वजन काटा १,(sanitiger) व मशिन १, इत्यादी डिजिटल शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक चिलकेवार मॅडम, ग्रामसेवक वारले, सरपंच लक्ष्मीबाई गंगाधरराव आगळे, संतोष पाटील आगळे, उपसरपंच गंगाधर पाटील शिंदे, चेअरमन आनंदराव पाटील शिंदे, मारोती पाटील आगळे, शा.शि.समिती अध्यक्ष दत्ताहरी पा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे,माधव इबितवार,प्रल्हाद निदाने,हाणमाबाई कोपरे हे उपस्थित होते.